आमच्या भेटीचा महिना:
ऑक्टोबर ३
हवामान स्थिती:
३०
खाद्य वैशिष्ट्य:
-
खरेदीच्या वस्तू:
-

भारतात ११ प्रकारचे पोपट आढळतात. दिसण्यात, रंग रूपात कमी-जास्त फरक असतात पण मराठीत आपण त्यांना पोपट म्हणतो. पण तुम्हाला माहीत आहे का या ११ मधे एकमेव खरा पोपट आहे आणि तो म्हणजे “पिचू पोपट ज्याला भुंडा पोपट” असेही म्हणतात. याचे इंग्रजीत नाव “वर्नल हँगिंग पॅरेट – Vernal Hanging Parrot” असे आहे.

तुम्ही म्हणाल आता हे काय नवीन? पण थांबा … इंग्रजी नावांप्रमाणे बाकी पोपट हे parakeet आहेत ज्यांची लांब शेपटी असते.

तर चला प्रवासाची सुरुवात करूया, पुण्यातील स्वारगेट पासून साधारण ४० किमी अंतरावर पांगरे गावाजवळ आहे शेलार फार्म. आम्ही पुण्यातून पहाटे ५.३० ला निघालो (गूगल मॅप ची लिंक या लेखाच्या शेवटी तुम्हाला मिळेल).

photographer at travelclix

दिवे घाटामध्ये मस्त कडक चहा आणि समोर सुदर असा परिसर

जाताना ३-४ किमी अलीकडे सुंदर नागमोडी रास्ता, झाडी, डोंगर आणि सूर्योदय पाहायला मिळाला.

one the way to shelar-farm

सुंदर नागमोडी रास्ता, झाडी, डोंगर आणि सूर्योदय

आम्ही बरोबर ७ वाजता तिथे पोहोचलो. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरु झाला होता, बाजरीच्या कणसांवर सूर्याची सोनेरी किरणे पडली होती.

golden sunlight on pearl millet crop

बाजरीच्या कणसावर पडलेली सूर्याची सोनेरी किरणे

colorfull birds in single photoframe

रंगीबेरंगी सुंदर पक्षी

बरेच पक्षी या बाजरीच्या कणसांवर मनसोक्त ताव मारत होते. आम्ही लगेच कॅमेरा तयार केला आणि एक एक पक्षी टिपायला सुरुवात केली.

I am Kedar, photographer at travelclix

नमस्कार मी केदार

I am Mandar, photographer @ travelclix

नमस्कार मी मंदार

मंगळवार असल्याने इतर छायाचित्रकार कोणी नव्हते, पण काही सोबती नक्कीच होते. शेताजवळ हे करडू बागडत होते आणि टेकडीवर या गायी चरत होत्या.

goat at shelar farm

शेताजवळ हे करडू बागडत होते

cattle shelar farm

टेकडीवर या गायी चरत होत्या

आम्ही पाहिलेल्या पक्ष्यांची ओळख करून घेऊयात:

हा सुंदर पिवळ्या आणि तपकिरी रंगाचा पक्षी आहे नर सुगरण (Baya Weaver – male ), मादी साधारणतः भुरकट रंगाची असते.

baya weaver bird - male eating pearl millet

बाजरीच्या कणसावर बसलेला सुगरण – नर पक्षी

baya weaver bird - female and butterfly

सुगरणाची मादी आणि फुलपाखरू

नदी किनारी झाडांवर अथवा शेतातील झाडांवर सुगरणीची सुंदर घरटी तुम्ही पहिली असतील.

baya weaver bird - male eating pearl millet

बाजरीच्या कणसावर बसलेला सुगरण – नर पक्षी

baya weaver bird - male eating pearl millet

बाजरीच्या कणसावर बसलेला सुगरण – नर पक्षी

सुगरण त्यांच्या अद्भुत विणकाम आणि सुंदर रंगांमुळे पक्षीप्रेमींमध्ये लोकप्रिय आहेत.

baya weaver bird - female eating pearl millet

बाजरीच्या कणसावर बसलेली सुगरण – मादी पक्षी

baya weaver bird - female

बाजरीच्या कणसावर बसलेली सुगरण – मादी पक्षी

सुगरणाची मादी आणि हे काय तिचे पिल्लू पण आहे. कणसातून एक एक दाना काढायचा अवकाश आणि पिल्लू आ करुन बसलेलेच आहे 😄😄😄

baya weaver feeding bajara baby

सुगरणाची मादी आणि हे काय तिचे पिल्लू

लाल मुनिया (Red Avadvat )हा एक सुंदर पक्षी आहे, जो आपल्या आकर्षक रंगामुळे पक्षी निरीक्षण करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. या पक्ष्याच्या शरीरावर लाल रंग आणि छोटे छोटे ठिपकयांमुळे अधिक सुंदर दिसतो.

Red Avadvat on Peral Millet

लाल मुनिया (Red Avadvat )

गौरव शेलार या तरुणाने या स्थलांतरी पोपटाचे महत्व जाणून इथे या पक्ष्यांच्या निरीक्षणाची आणि छायाचित्रकारांची सोय केली आहे. गौरव शेलार बरोबर आम्ही चर्चा करून या उपक्रमाबद्दल आणखी माहिती जाणून घेतली जी तुम्हाला आमच्या पिचू पोपटाच्या विडिओ मध्ये मिळेल.

विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा: भारतातील एकमेव खरा पोपट – पिचू किंवा भुंडा पोपट, Vernal Hanging Parrot | shelar farms | Travelclix

gaurav shelar guiding to spot birds at farm

गौरव शेलार पक्षी निरीक्षणासाठी मदत करताना

हा आहे गोरली म्हणजे Common Rosefinch, याचे डोके, पाठ, छाती गुलाबी रंगाची असते. सुंदर पक्षी आहे नाही का?

Common Rosefinch

गोरली ( Common Rosefinch )

Common Rosefinch

गोरली ( Common Rosefinch )

common rosefinch

गोरली ( Common Rosefinch )

हा आहे युवराज किंवा तुरेवाला भारीट किंवा शेंडीवाली रेडवा, किंवा बोचुरडी किनव्क डोंगरफेंसा बापरे एवढी नावे पण इंग्रजीत याल crested bunting म्हणतात.

Crested Bunting

युवराज किंवा तुरेवाला भारीट ( Crested Bunting )

युवराज नाव याला साजेस वाटत ते त्याच्या डोक्यावरील तुऱ्यामुळे.

Crested Bunting

युवराज किंवा तुरेवाला भारीट

हा आकाशात उडतोय सापमार गरुड म्हणजेच Short-toed Snake eagle.

short toed snake eagle

सापमार गरुड म्हणजेच Short-toed Snake eagle

मागे सारखा कटकट नाही पण वटवट केल्याचा आवाज येतोय अरे हा तर वटवट्या, राखी वटवट्या म्हणजे Ashy Prinia. एवढुसा पक्षी आहे पण आवाज मोठा असतो याचा.

Ashy Prinia

Ashy Prinia

तेवढ्यात तिथे केरळचे सुप्रसिद्ध फोटोग्राफर श्री जयराज सर त्यांच्या इतर मित्रांसोबत आले.

jayaraj sir with friends

jayaraj sir with friends

jayaraj sir with friends

jayaraj sir with friends

हि आहे ठिपकेदार मुनिया म्हणजेच Scally Breasted munia. केव्हातरी आकाशातून एक अति लांब शेपटीचा वाटणारा पक्षी उडत असतो, जर तो स्वर्गीय नर्तक नसेल तर तो शक्यतो ठिपकेदार मुनिया असते.

स्वर्गीय नर्तक चा विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

scaly breasted munia

ठिपकेदार मुनिया ( scaly breasted munia )

हा पक्षी आहे शुभ्रकंठी म्हणजे Indian silverbill.

Indian silverbill

शुभ्रकंठी – Indian silverbill

बरेच पक्षी येत होते आणि जात होते पण ज्याच्यासाठी आम्ही येथे आलो तो बराच वेळ झाला तरी दिसेना मग तो एक झाडावर दिसला बघा तुम्हाला दिसतोय का:)

find the parrot

find the parrot

ओळखला का मला? मी आहे पिचू पोपट किंवा भुंडा पोपट म्हणजे वर्नल हँगिंग पॅरेट 🙂

vernal hanging parrot

vernal hanging parrot

हा असा झाडावरून उलट लटकत उतरतो आणि खातानाही उलट लटकुनच खातो म्हणूनच कदाचित या पोपटाला इंग्रजीमध्ये Vernal Hanging Parrot असे म्हणतात.

vernal hanging parrot

vernal hanging parrot

मराठीत आपल्यासाठी हा पोपटाच पण इंग्रजीमध्ये बाकीचे जे आहेत जसे की Rose Ringed parakeet, plum-headed parakeet, alexandrine parakeet हे parakeet आहेत पण भारतात parrot हा एकमेव vernal hanging parrot आहे.

vernal hanging parrot

vernal hanging parrot

हा साधारण पावसाळ्यात खाण्याच्या शोधात कोकणातून इथे येतो. यांचे मुख्य खाद्य हि छोटी फळे, बिया, धान्ये जसे कि बाजरीची कोवळी कणसे. हे आग्नेय आशिया च्या काही भागांत तसेच भारतीय उपखंडात आढळणारे पक्षी आहेत. चकचकीत हिरव्या रंगाचा, लाल चोच आणि गळयावर एक निळसर भाग म्हणजे नर-पक्षी. शेपटीच्या बाजूला गडद लाल पाठ नर-पक्ष्यांमध्ये आढळते . गळयावर निळसर भाग नसेल तर मादा किंवा पूर्ण वाढ न झालेलं तरुण पक्षी.

vernal hanging parrot

vernal hanging parrot

ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात इथे पीक म्हणून बाजरी लावली जाते. त्यांना कणसे आली हे पोपट येथे दिसू लागतात. कणसातील बाजरीची दाणे काढून त्यातील रसाळ भाग हे खातात आणि दाणे सोडून देतात.

vernal hanging parrot

vernal hanging parrot

पक्ष्यांना मोकळ्या वातावरणात स्वच्छंद उडताना, बागडताना आणि निर्भीड जगताना पाहायला किती छान वाटते हो ना?

vernal hanging parrot

vernal hanging parrot

विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा: भारतातील एकमेव खरा पोपट – पिचू किंवा भुंडा पोपट, Vernal Hanging Parrot | shelar farms | Travelclix

कसे पोहोचाल?

स्वारगेट पुणे येथून दिवे घाटातून सासवडला जायचे. सासवड मधून बाहेर पडलात कि उजव्या बाजूला वीर धरणाकडे जायला एक रास्ता आहे. तिकडे वळून पुढे साधारण ८-९ किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या उजव्या बाजूलाच शेलार फार्म आहे. गूगल मॅप पाहत जाल तर सोपे जाईल अथवा शेलार फार्म लक्षात येत नाही.

  • स्वारगेट (पुणे) ते शेलार फार्म अंतर : ४० किमी
  • उत्तम वेळ / हंगाम : साधारण जुलै अखेर ते ऑक्टोबर सुरुवात पर्यंत

मार्ग पहा

तुम्हाला आमचा छायाचित्रांचा आणि माहितीचा प्रवास नक्कीच आवडला असेल. आपला अभिप्राय कंमेंट मध्ये नक्की नोंदवा आणि हा प्रवास share करा हि विनंती.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.